अविस्मरणीय स्वातंत्रदिन‌

दरवर्षी प्रमाणे यंदाही सकाळी लवकर उठून सर्व घरची कामे करुन, मुलाची तयारी आटोपून घाईघाईत शाळेत गेली. कारण काय विचारता? आज १५ ऑगस्ट किती कामे करायची आहे! सर्वप्रथम शाळेत जाऊन सफाई करणाऱ्या दादाला बोलवून त्यांना मुलांची व पालकांची बसायची व्यवस्था करायला सांगायची आहे, झेंड्याखाली रांगोळी तसेच प्रवेशद्वारावर हि रांगोळी काढायची आहे, मुलांसाठी  चॉकलेट  व पालकांची चहाची सोय लावायची आहे. त्यात मूलांची भाषणाची तयारी झाली कि नाही ते पहायला हवे तयारी करायला नंतर वेळ मिळणार नाही, मग स्वातंत्रदिन पालक उपस्थिती रजिस्टर काढून ठेवावे लागेल. नाही तर दरवर्षी प्रमाणे विसरुन जाऊ, आता काय राहिले बरं अरे हो सर्व यायच्या आधी झेंडा बांधून वर लावावा लागेल, दिनेशभैय्या याबरं लवकर आटोपून घेऊ सर्व ७.३० झाले. आता कोणत्याही क्षणी पालक व मुले येतील मग वेळच मिळणार नाही, त्यात मुलींची स्वागतगीताची एकदा रंगीत तालीम घ्यावी लागेल नाहीतर वेळेवर गडबड होईल, आता फलकलेखन आटोपून घेऊ म्हणजे झाले सर्व काम फलकलेखन झाल्यावर आठवले, अरे राष्ट्रगीतासाठी स्पिकर राहिला, मग तो हि दिनेशभैय्याकडून काढून घेतला. झाले आता! असे म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला व भैय्याने घंटा वाजवली…पण हे काय….घंटा वाजवून १५मि. झाली तरी कुणीही नाही ऐरवी घंटेच्या पहिल्या ठोक्यावर हजर राहणारे चिमुरडे गेली तरी कुठे? शाळेचा पहिला राष्ट्रीय सण व एक ही विद्यार्थी, पालक शाळेकडे फिरकले हि नाही ? हे सर्व शाळेतील इतर शिक्षकांच्या कानावर घालते तर ते हि कुठेच दिसत नाही? शाळेला आज दिवसभर सुट्टी या आनंदात कधी एकदा कार्यक्रम संपून गोड मिळतं व घरी पळत जातो असे विचार करणारे विद्यार्थी कुठे गेले? “मॅडम झेंडावंदन कितने बजे करेंगे” असे विचारणारे शा.व्य.स.चे लोकहि दिसेनासे झाले. आज हे होतंय तरी काय? खूप एकटं वाटत होतं… असह्य करणारी ती शांतता..याचा विचार करून करून अगदि डोकं फुटायची वेळ आली. अचानक एक आवाज आला आई… ग आई … गमी खळबळून जागी झाली, तर माझा मूलगा झोपेतून उठून मला हाक मारत होता… मी भानावर आले व माझ्या लक्षात आले की, हे सर्व स्वप्न होतं खूप भयंकर भूतकाळात कधीही न घडलेलं पण आज घडतंय…ते या “कोरोना” मुळे खरचं आज आपण जे जिवन जगतोय हे एका स्वप्ना सारखेच तर आहे. कुणी विचारतरी केला होता का, की भविष्यात असे काही घडेल पण ही लढाई आपण जिंकू आणि पुढील वर्षी स्वातंत्रदिनच काय, सर्वसण-उत्सव आनंदात साजरे करु व सर्व हरवलेले क्षण परत जगू …

भारतमाता कि जय

स्वातंत्रदिन चिरायू होवो…

 (सदर लेखाच्या लेखिका सौ. अंजली कडू ह्या जि. प. प्राथ. मराठी शाळा, झापल, पं. स. धारणी जि. अमरावती येथे शिक्षिका आहेत.)