‘शिक्षक ध्येय’ शिक्षकांसाठी संजीवनी…

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, व्यक्ती जीवन जगत असतांना जास्तीत जास्त स्वार्थी हेतूने व परस्पर द्वेषाने जगत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. शिक्षक हा एक समाज घडवणारा महत्वाचा घटक आहे. सभोवती वेगवेगळ्या विचारांचे-आचारांचे शिक्षक आपल्याला पहायला मिळतात. विचारानुसार आचार असते, जसे की चांगल्या विचाराने प्रभावित शिक्षक हा सातत्याने आपले कार्य चांगलेच करत असतात.चांगला शिक्षक सतत आपल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच धडपड करत असतो तो इतरांच्या दृष्टीने वेडा, शिल्लक, शिष्ट, शहाणा संबोधला जातो, कारण त्याचे कार्य इतरांपेक्षा वेगळे असते, त्याचे ध्येय वेगळे असते, त्याचे लक्ष फक्त आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणने, गुणवत्ता विकास करणे हेच असते. त्यामुळे तो शिक्षक आपल्या व्यावसायिक शिक्षक बंधुच्या दृष्टीने थोडा वेगळा संबोधला जातो. खरं तर आज शिक्षकांना जास्तीत जास्त नाव ठेवणारे आपलेच शिक्षक बांधव असतात त्यामुळे आपण इतरांना दोष देऊन काही उपयोग नाही. आपणच आपले एकमेकांचे कौतुक न करता, द्वेष करत शत्रू बनलो आहे, अशी परिस्थिती असतांना साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’ सारख्या सकारात्मक विचार मंचाचे संपादक आदरणीय मधुकर घायदार यांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी *कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार* देण्याची जी हिंमत दाखवली हे म्हणजे अफलातून कार्य आहे. कारण एक शिक्षकच शिक्षकाला उत्कृष्ट प्रकारे ओळखू शकतो, समजू शकतो. चांगले काम करून शाळेची प्रगती, विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी किती मेहनत आणि योगदान द्यावे लागते व त्याचा किती चांगला परिणाम होतो हे एक शिक्षकच जाणू शकतो. याऊलट एका शिक्षकाने चांगले काम केले नाही तर त्याचे शाळेवर व विद्यार्थ्यांवर किती वाईट परिणाम होतो हे सुद्धा शिक्षकच जाणू शकतो. आज जि. प. शाळा चांगल्या आहेत याचे सर्व श्रेय शिक्षकालाच जाते तसेच काही ठिकाणी शाळेची व विद्यार्थ्यांची जी अधोगती होत आहे याचे श्रेय सुद्धा शिक्षकालाच जाते. अशा वेळी शैक्षणिक परिस्थितीत अनुकूल व प्रतिकूल परिणामाचे उत्तम ज्ञान शिक्षकालाच अवगत असते. ‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार यांनी जो उपक्रम सुरू केला आहे हा अभिनव उपक्रम आहे. मला 5 सप्टेंबर 2018 ला *महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार* मिळाला आहे, पण त्यापेक्षाही मला हा साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’ यांच्या वतीने *राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार* मिळाला याचा खूप मोठा आनंद झाला कारण माझ्या कामाची दखल  माझ्या व्यवसाय बंधूने -माझ्यासारख्या एका शिक्षकाने- घेतली आहे की ज्यांना माझ्या प्रत्येक परिस्थितीची जाणीव आहे. खरं तर या ‘शिक्षक ध्येय’ या नावातच खुप काही दडलेले आहे. ध्येयाने वेडा असे याचा अर्थ आहे, कदाचित मधुकर घायदार हा शिक्षक ध्येय वेडाच असावा कारण ध्येय वेडे लोकच ऐतिहासिक कार्य करू शकतात, तेही सध्या सगळीकडे द्वेषाचे वातावरण असतांना हा अभिनव उपक्रम यांना सुचला हे सुद्धा कौतुकाची बाब आहे. आज एखाद्याला जेवण देऊन आनंद देणे सोपे आहे, पण चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाची पावती देऊन त्याचे कौतुक करून पुरस्कार देऊन सन्मानित करणे ही खुप अवघड बाब आहे आणि ही अवघड बाब मधुकर घायदार यांनी सिद्ध करून दाखविलेली आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार निवडीचे निकष मला खुप आवडले . आपल्या शाळेत गुणवत्ता विकासासाठी विद्यार्थ्यांसाठी आपण कसे व कोणते उपक्रम राबविले आहे याचे नवोपक्रम पीडीएफच्या माध्यमातून आँनलाईन घेण्यात आले, व्वा! किती छान कल्पना आहे म्हणजे तुम्हाला याची काँपी करता येऊ शकतंच नाही‌. बरं, एवढेच नाही तर सातत्याने शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी लेख, यशोगाथा, उत्तम अनुभव शैक्षणिक प्रयोग अशा प्रत्येक बाबतीत प्रकाशन करण्यासाठी जणू वसाच घेतला आहे. मी सातत्याने हे साप्ताहिक वाचत असतो या साप्ताहिकाच्या माध्यमातून मला वेगवेगळ्या उपक्रमशिल शिक्षकांचे कार्य सहज माहिती होते. चांगल्या शिक्षकांचे काम वाचून मला प्रेरणा मिळते. सर्जनशील, सृजनशील शिक्षकांची ओळख होते, त्यांच्या कार्यापासुन नवीन शिकायला मिळते याचा आनंद होतो, समाधान वाटते. श्री. घायदर सर  आपण खुप मोठे अभिनव कार्य केले आहे. त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप अभिनंदन, सर आपण खरोखर एक ‘आदर्श शिक्षक’ आहात याचीच ही पावती आहे आपल्या बाबतीत लिहायचे तर कदाचीत शब्द कमी पडतील सर, तरीही आपण शिक्षकांसाठी जे काम सुरू केले आहे त्यासाठी खुप खुप अभिनंदन व तुमच्या पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा…

शुभेच्छुक – श्री. अनिल चव्हाण, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक, आंतरराष्ट्रीय जि. प. शाळा, बोराखेडी ता. मोताळा जि. बुलढाणा 9767866933/7796228888