कोरोना काळातही उपक्रमशील शाळा कोरोना काळातही उपक्रमशील शाळा:  वानवडयाची जिल्हा परिषद शाळा

शोभा माने, लातूर मो. 8208334145

कोरोनाचा कहर सुरु झाला आणि महाराष्ट्रात मार्चमध्ये  जीवितहानी रोखण्याकरिता लॉकडाउन झाले खरे पण मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या अभ्यासाचा  प्रश्नही  ऐरणीवर होता.खरे तर मार्च म्हटलं तर विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा सरावाचा महिना असतो. विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत असतात काही दिवसात लॉकडाउन उठेल आणि परीक्षा होतील असे वाटले पण कोरोना आपला मुक्काम हटवायला तयार नाही म्हणून SCERT च्या शाळा बंद पण शिक्षण सुरु अंतर्गत विद्यार्थ्यांना  शैक्षणिक उपक्रम share करण्यासाठी दोन वर्षापूर्वी तयार केलेल्या अगोदरच असलेल्या व्हाट्सअप group वर अभ्यास नियमित पाठवायला सुरुवात केली.

लॉकडाउनमुळे पालक घरीच होते त्यामुळे त्यांनी रिकाम्या वेळेचा सदुपयोग केला अन  विद्यार्थ्यांचा छान अभ्यास करून घेतला. रोजच्या रोज group वर अभ्यास पाहून शिक्षकांनाही काही अंशी आत्मिक समाधान मिळू लागले पण हे फक्त काही दिवसा पुरतेच मर्यादित होते कारण लॉकडाउन शिथिल झाले अन पालक शेती काम, उद्योगधंद्यासाठी घराबाहेर पडले पर्यायाने त्यांच्या सोबत मोबाईलसुद्धा बाहेर पडले व्हाट्सअपवर अभ्यास मिळाला तरी पुन्हा शिक्षकांना केलेला अभ्यास group वर पाठवणे दुरापास्त झाले. हाताला काम नसल्याने काही जण नेट पॅक भरू शकत नव्हते.काही विद्यार्थी ऑनलाईन तर अनेक जण ऑफलाईन म्हणून विदयार्थी *सोयीनुसार अभ्यास* देणे सुरु झाले काही पालकांची आर्थिक समस्या ओळखून सर्वच 1लीच्या विद्यार्थ्यांना स्वलिखित स्वाध्याय वह्या आणि उर्वरित वर्गातील  विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून स्वखर्चाने *शै.साहित्य वाटप* करण्यात आले. 

व्हाट्सअप group वरील तथा SCERT च्या *शाळा बंद पण शिक्षण सुरु-* — सदरा खालील दिक्षा app वरील  नियमित अभ्यासमाला  शिवाय  ज्यांना ऑनलाईन शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मासिक नियोजन नुसार दैनंदिन अभ्यासच्या झेरॉक्स देण्यात येत असून अशा पद्धतीने ऑफलाईन अभ्यास सोयीनुसार दुहेरी प्रकारे अभ्यास सुरु झाला.

कोविड कॅप्टन : अपवादात्मक स्थितीत ऑफलाईन मध्येही  सामिल न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोविड कॅप्टन ही मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील तथा शिक्षणाधिकारी मा. जामदार वैशाली ताई यांच्या मार्गदर्शन नुसार गट निहाय अभ्यास करून घेण्याची मात्रा सुरु केली शेजारी राहणारे अनेक वर्गातील विद्यार्थी एकत्र करून अभ्यास घेणारे वरच्या वर्गातील कोविड कॅप्टन मुलांकडून वाचन, लेखन, श्रुत लेखन, गणिती क्रिया, कविता गायन इंग्रजी शब्द लेखन,  वाचन इ च्या माध्यमातून अभ्यास घेत आहेत. सानिका निकम प्रणिता मिरकले ऐश्वर्या घोडके, वैष्णवी कोळी, मयुरी कोळी आदिती अंधारे, प्रियांका सूर्यवंशी किरण घोडके इ विद्यार्थी कोविड कॅप्टन म्हणून मार्गदर्शन करत आहेत नरसोबा रंदवे,  सरस्वती घोडके, राहूल माने, शरद माने, कविता तळेकर, जयश्री कदम,  माधव सोमवंशी या गावातील युवा कार्यकर्त्याचेही कोविड कॅप्टनला बिशेष मार्गदर्शन मिळत आहे  दैनंदिन वेळापत्रक अन्वये शिक्षकही गावात जाऊन सोसिअल  डिस्टंस ठेवून विद्यार्थी अभ्यास तपासून मार्गदर्शनपर सूचना करत आहेत.

विविध ऑनलाईन उपक्रम आयोजन : किशोरीसाठी मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन-सर फाउंडेशन च्या महिला जिल्हा समन्वयक आणि शाळेतील उपक्रमशील शिक्षिका म्हणून शोभा माने यांच्या संकल्पनेतून  झूम app वर मुलींसाठी तज्ञामार्फत ऑनलाईन मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीर गुरु पौर्णिमा लोकमान्य टिळक पुण्यतिथी सारखे दिनविशेषही साजरे करण्यात आले. 

विद्यार्थी उपजत कला गुणांचा विकास : उपक्रमशील शाळा म्हणून परिचित असणाऱ्या या ऑफलाईन शाळेत असंख्य विद्यार्थी अनेक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न शील असतात. पण सध्या शाळा बंद असल्याने यावर शाळेने तोडगा काढत उपाय शोधले आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान, एस एम एस group, इनरव्हील क्लब कडून घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय वक्तृत्व, कथा- कथन  स्पर्धेत  शिक्षक संघच्या वतीने तसेच औसा  पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या गंदगीमुक्त भारत अभियान विषयावर तालुका स्तरीय ऑनलाईन वक्तृत्व निबंध चित्रकला स्पर्धेत  सहभागी होत प्रणाली कदम, सानिका निकम या सारख्या विद्यार्थ्यांनी बक्षीसही पटकावले.सह्याद्री वरील टिलीमिली कार्यक्रम इतकेच नव्हे तर विद्यार्थी वाढदिवसही ऑनलाईन साजरे करण्यात आले.  विद्यार्थ्यां सोबत शिक्षकांनी ही स्पर्धेत सहभागी होत  बक्षीस मिळवले. शोभा माने यांना मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षक सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत  द्वितीय क्रमांक मिळाला लॉक डाउन मध्ये जणू उपजत कला गुणांना संधीच मिळाली. विद्यार्थी अभ्यास नियमित सुरु राहावा म्हणून शाळेचे मु अ पांढरे जगन्नाथ, भोसले संजय,  कुलकर्णी मीरा, शोभा माने, पुरी रचना, कुरुलकर अनिता, ज्योती मादळे, मंदाकिणी उकादेवडे इ सर्व शिक्षक प्रयत्न शील आहेत. सरपंच शहाजी पाटील उपसरपंच शालूबाई मिरकले शा व्य स अध्यक्ष दयानंद तळेकर, उपाध्यक्ष नरसोबा रंदवे, ग्रा पं सदस्य शरद माने धनराज कोळी सरस्वती घोडके युवा कार्यकर्ता राहूल माने इ चे सहकार्य नेहमीच मिळते म्हणून जि प वानवडा  शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात सुपरिचित असल्याचे दिसून येते. 

(साभार: प्रेमजीत गतिगंते, मुंबई) (श्रीमती शोभा माने ह्या जि. प. प्रा. शाळा, वानवडा, ता. औसा, जि. लातूर या शाळेत शिक्षिका आहेत)