श्री. तुकाराम काळू चौधरी, मो. 8262870432 जि. प. प्राथमिक शाळा
माणीपाडा ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

         केलेस उपकृत मला सन्मार्ग दाखवून
         हे गुरुदेवा तुला माझे विनम्र अभिवादन
               अज्ञानी काळ्या अंधारात
               आलो उठत पडत
               भेटलास तू अवचित
               मज आणिलेस प्रकाशात
         त्या ज्ञानदिव्य तेजाने उजळले माझे जीवन
         हे गुरुदेवा तुला माझे विनम्र अभिवादन
               वासरू गोठ्यात हंबरते
               आईस हाका मारते
               गाय टवकारून ऐकते
            मग पान्हाऊन धावते
         तसाच तुही धावसी पान्हा ज्ञानाचा घेऊन
         हे गुरुदेवा तुला माझे विनम्र अभिवादन
               तू असशी असा बागवान
               जीवनाचे फुलवीसी नंदनवन
               जगाचे कराया कल्याण
               दुःख दारिद्र्य घेशील शोषून
         प्रेम कारुण्य सदा पाझरे तुझ्या हृदयातून
         हे गुरुदेवा तुला माझे विनम्र अभिवादन
               जगी जन्मलो मी एक
               मर्त्य मानव आकारहीन
               तूच दिला जीवना आकार
               योग्य संस्कार देऊन
         ठायी ठायी दाखवी मार्ग तुझीच रे शिकवण
          हे गुरुदेवा तुला माझे विनम्र अभिवादन