मनोहर चौधरी, मुख्याध्यापक, धुळे, मो. 9881033270

जाणवलेली ठळक गोष्ट म्हणजे रेखाटन, रंगकाम, हस्तकला यांचा समन्वय साधून शैक्षणिक साहित्याची निर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन म्हणजे आरेखन होय. आरेखनात शिक्षकाने महत्वाची ध्यानात ठेवायची गोष्ट म्हणजे सर्वात आधी घटक व उपघटकांची निवड करणे. कोणत्या घटकासाठी कोणते शैक्षणिक साधन तयार करता येईल तसे पाजावे व त्यानुसार ते तयार करून घ्यावे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी अध्यापन पद्धती प्रभावी, गतिमान, अर्थपूर्ण आणि मनोरंजक करणे गरजेचे आहे. यासाठीच या दृक-श्रवण साधनांचा योग्य वेळी योग्य तऱ्हेने वापसर करणे, गरजेचे आहे. असे अध्यापन ज्ञानरचनावादी पद्धतीचे होऊ शकेल. आज अशी अध्यापन पद्धती काळाची गरज आहे.

आरेखन या शब्दाला इंग्रजीत Graphics म्हणतात, हे मला माहित होते परंतु आरेखन म्हणजे काय? असे कोणी विचारले तर मला आरेखनचा अर्थ व्याख्या संबोध प्रतिशब्द काही काही म्हणून माहीत नव्हते.

     महाराष्ट्र राज्य दृक- श्रवण शिक्षण संस्था, पुणे-30 चा आरेखन प्रशिक्षणाविषयीचा आदेश मला प्राप्त झाला आणि माझ्यातला चित्रकार शिक्षक जागृत झाला. आरेखनचे विभाग प्रमुख मा.भारती साहेब, चित्रकार मा.आनंद तुपे सर व संस्थेचे प्राचार्य मा.सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय प्रशिक्षण मी पूर्ण केले आणि त्याचवेळी माझं आरेखन बद्दल असलेलं अज्ञान दूर झालं. एरवी पतंग, टेबल, छत्री ही चित्रं फळ्यावर जेमतेम रेखाटणारा शिक्षक मी परंतु प्रशिक्षणानंतर आरेखनचे 10 प्रकार बेमालूमपणे तयार करून विद्यार्थ्यांसमोर व कार्यशाळेत शिक्षकांसमोर त्यांचे सराईतपणे सादरीकरण करतो. याचे सर्व श्रेय मी ‘महाराष्ट्र राज्य द्रुक-श्रवण शिक्षण संस्था, पुणे-30’या संस्थेला देतो. त्याचा हा रंजक माहितीपट महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांना दीपस्तंभ वाटावा यासाठी आपणापुढे सादर करीत आहे.

 आरेखनात पुढीलप्रमाणे 10 शैक्षणिक साधनांची निर्मिती केली जाते.

  • तरंग चित्र (Mobile)
  • तक्ते (Chart)
  • क्षणचित्रे (Flash Cards)
  • चलतचित्र (Animation)
  • घडीचित्र (Folder)
  • मॅजिक बॉक्स (Magic Box)
  • कल्पफलक (Flannel Board)
  • त्रिमिती चित्र (Three Dimention)
  • डायमंड शेप (Diamand Shape)
  • उत्रीळत चित्र (Jump Up Diorama)

उपरोक्त शैक्षणिक साधन निर्मिती साठी पुढीलप्रमाणे जुजबी साहित्याची गरज असते.

1. सर्व प्रकारचे पेपर जसे माऊंट बोर्ड,प्लॉरोसेन्ट,डुप्लेक्स,हॅन्डमेड,ब्राउन पेपर,

2.वॉटर कलर,स्केचपेन,मार्कर पेन,

3.कैची, ब्लेड, ब्रश, पट्टी, पेन्सिल,फेवी कॉल, दोरा, थर्मोकोल, इ.

आरेखन प्रशिक्षणात मला जाणवलेली ठळक गोष्ट म्हणजे रेखाटन, रंगकाम, हस्तकला यांचा समन्वय साधून शैक्षणिक साहित्याची निर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन म्हणजे आरेखन होय. आरेखनात शिक्षकाने महत्वाची ध्यानात ठेवायची गोष्ट म्हणजे सर्वात आधी घटक व उपघटकांची निवड करणे. कोणत्या घटकासाठी कोणते शैक्षणिक साधन तयार करता येईल तसे पाजावे व त्यानुसार ते तयार करून घ्यावे.

            प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी अध्यापन पद्धती प्रभावी, गतिमान, अर्थपूर्ण आणि मनोरंजक करणे गरजेचे आहे. यासाठीच या दृक-श्रवण साधनांचा योग्य वेळी योग्य तऱ्हेने वापसर करणे, गरजेचे आहे. असे अध्यापन ज्ञानरचनावादी पद्धतीचे होऊ शकेल. आज अशी अध्यापन पद्धती काळाची गरज आहे.

या शैक्षणिक साधनांमुळे अध्यापन प्रक्रियेत पुढील फायदे होतात-

१) अध्यापन कार्य प्रभावीपणे करता येते.

२)अध्यापन कार्य मनोरंजक होते.

३)विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित करून ते केंद्रित करण्यास मदत होते. 

४)कमी वेळात अधिकांश ज्ञान देता येते.

५)अध्यापन कार्यात सुलभता,सुगमता निर्माण होते. 

६)अध्यापन कार्यात नावीन्य निर्माण करता येते.

७)प्रभावी प्रेरक म्हणून या साधनांचा उपयोग होतो.

८)याद्वारा दिलेली माहिती मनात चिरकाल टिकते. .

अशा तऱ्हेने या साधनांमुळे विश्वाचा अनुभव देता येतो व अनुभवाचे विश्व वर्गात आणता येते.

(श्री. मनोहर धनगर चौधरी हे जि. प. शाळा चारणपाडा, ता. शिरपूर, जि. धुळे येथे मुख्याध्यापक आहेत)